🔥हाच तो भाजप चा यवतमाळ जिल्हा सचिव व राळेगाव विधानसभा प्रमुख सतीश सुमती नारायण मानलवार गरीब जनतेची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारा पांढरपेशा लिडर🔥हेच ते ना.अशोक उईके आदिवासीं मंत्री यांचा पांढरपेशा सतीश मानलवार ला भ्रष्ट कारभार करण्यासाठी देतात साथ🔥हाच तो मुख्य सूत्रधार व उज्ज्वल चिंतावार जनतेचे पैसे घेवून झाले फरार
🔥बाभूळगावातील कथित पांढरपेशा सतीश मानलवारचा आर्थिक घोटाळा उघडकीस; राजकीय छत्रछायेखाली फसवणुकीचा गोरखधंदा?
यवतमाळ प्रतिनिधी-/ स्वतःला पांढरपेशा नेता म्हणून मिरवणारा सतीश मानलवार आणि त्याच्या साथीदारांनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समृद्ध जीवन मल्टीस्टेट सोसायटी आणि विविध आर्थिक योजनांच्या नावाखाली भरघोस परताव्याचे आमिष दाखवून स्वतःच्याच समाजबांधवांसह निष्पाप नागरिकांचे पैसे हडप करणारा मानलवार सध्या राजकीय वरदहस्ताखाली मोकाट फिरत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. महेश मोतेवारच्या अटकेनंतर फरार झालेली ही टोळी आता राजकीय संरक्षणाच्या जोरावर पुन्हा सक्रीय झाल्याने, बाभूळगाव परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
बाभूळगाव परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि पांढरपेशा नेता म्हणून वावरणाऱ्या सतीश मानलवार आणि त्याचा निकटवर्तीय उज्ज्वल चिंतावार यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी संगनमत करून विविध विमा कंपन्या, खाजगी बँका आणि महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये नागरिकांना मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. दरमहा भरघोस व्याज आणि दुप्पट परताव्याचे खोटे आमिष दाखवून स्थानिक नागरिकांकडून लाखो रुपयांची माया गोळा करण्यात आली.जेव्हा संस्था अडचणीत आल्या आणि मुख्य सूत्रधार महेश मोतेवार यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांची रवानगी कारागृहात झाली, तेव्हा स्थानिक पातळीवर लोकांचे पैसे गोळा करणारे सतीश मानलवार व त्याचे साथीदार काही काळ भूमिगत झाले होते. गुंतवणूकदारांच्या ठेवी परस्पर हडप करून स्वतःचे खिसे भरल्यानंतर ही मंडळी फरार झाली होती. कष्टाचे पैसे अडकल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, मात्र एजंट म्हणून काम करणारे हे सूत्रधार स्वतःची जबाबदारी झटकून मोकळे झाले.काही काळ गायब राहिल्यानंतर मानलवार याने पुन्हा बाभूळगावच्या राजकीय वर्तुळात प्रवेश केला आहे. सध्या तो माजी मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचा आव आणत आहे. स्वतःला ‘मंत्र्यांचा डावा हात’ म्हणून मिरवणाऱ्या मानलवारचा हा राजकीय वावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा ठरत आहे. राजकीय दबावाचा वापर करून पोलीस तपास दडपण्याचा आणि तक्रारदारांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. हा राजकीय संबंध केवळ संरक्षणासाठी आहे की वसुलीच्या काळ्या धंद्यांसाठी, असा थेट सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
केवळ आर्थिक घोटाळेच नव्हे, तर या टोळीचे संबंध संशयास्पद व्यक्ती, चोरटे आणि बँकांना चुना लावणाऱ्या टोळ्यांशी असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. सामान्य जनतेची फसवणूक करून जमा केलेल्या काळ्या पैशातून स्वतःची संपत्ती उभी करणे आणि समाजात मात्र पांढरपेशा आव आणून फिरणे हा यांचा नित्यक्रम बनला आहे. महेश मोतेवार कारागृहात खितपत पडलेले असताना, स्थानिक पातळीवर लोकांचे पैसे लुटणारे हे सूत्रधार मात्र राजरोसपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आता एकत्र येऊन प्रशासनाकडे धाव घेतली आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने सतीश मानलवार, उज्ज्वल चिंतावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आर्थिक चौकशी करावी, त्यांची बेनामी मालमत्ता जप्त करावी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. जर प्रशासनाने या पांढरपेशा सूत्रधारांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा पीडित गुंतवणूकदारांनी दिला आहे.(क्रमशः)