🔥महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता प्रभात फेरी व स्वच्छता अभियान
आर्वी -/ विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित स्थानिक तपस्या पब्लिक स्कूल, आर्वी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
सी.बी.एस.ई.कडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी तपस्या पब्लिक स्कूल ते आर्वी बसस्थानकापर्यंत स्वच्छता प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्वी बसस्थानक परिसराची स्वच्छता करून आर्वी शहरातील नागरिकांना स्वच्छता व स्वच्छ परिसराचा संदेश दिला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या प्राचार्या सौ. शिवानी देशपांडे मॅडम, आर्वी बसस्थानकाचे प्रतिनिधी श्री. पचारे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता घोडमारे तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. राजेश घीमे उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेचे नृत्य शिक्षक श्री. नकुल महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. तसेच संगीत शिक्षक श्री. दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित स्वच्छता गीते सादर करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक श्री. मनोज चांदूरकर यांनी केले. शाळेच्या प्राचार्या सौ. शिवानी देशपांडे मॅडम यांनी उपस्थित जनसमुदाय व विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. किशोर राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. मिनल होरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. वैभव देशमुख, श्री. प्रकाश फसाटे, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या “शानदार हो मेरा भारत” या गीताने करण्यात आली.