🔥यवतमाळ जिल्हा सोयाबीन पीक विमा मध्ये सामील करून शेतकऱ्यांना लाभ मिळाला.🔥जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री संजय भाऊ राठोड साहेब यांचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन.
प्रतिनिधी आर्णी(जाकीर सोलंकी)
सोयाबीन पीक विम्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करावा, यासाठी आज मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाची अतोनात नुकसान झालेली आहे त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्याला मात्र सोयाबीन पिक विमा अंतर्गत का डावलण्यात आले हा विषय गंभीर आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहेत तरी यवतमाळ जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा योजना चा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड साहेब यांचे प्रयत्न आहे
यवतमाळ जिल्हा सोयाबीन पीक विम्यातून वगळला गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून यवतमाळ जिल्ह्याचा पीक विम्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.