यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे मतदान जनजागृती अभियान…

0

राजू वाटाणे / यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे दिनांक 2 एप्रिल रोजी प्रा.अरविंद राठोड व अजय वानखेडे यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी गावात जाऊन नागरिकांना मतदान प्रक्रिये मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेवून मतदान कऱण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यानी गावातील नागरीकाना तसेच आई वडील, दादा ताई यांना पत्र लिहून मतदान करण्याविषयी आपल्या भावना पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे व मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. असे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले तसेच विद्यालयांमध्ये विदयार्थ्याना मतदानाची शपथ देण्यात आली . याप्रसंगी विद्यालयातील श्री.पवार, सौ . कापकार, श्रीमती भोयर,कमठेवाड प्रा.कांबळे,लाभे, गुळघाने,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!