राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा मध्ये कु.मुक्ता विष्णू वाघ ला प्रथम,तर कु.सानव्ही वाघमारे ला उत्तेजनार्थ पुरस्कार…..

0

अमरावती -/ श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती मधील विद्यार्थ्यांचे चित्र स्व.बाबासाहेब ढोणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनीमध्ये श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती च्या 13 विद्यार्थी चे 40 चित्रांची निवड येथे झाली.तर त्यावेळी   संगीता अढाऊ अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला यांच्या हस्ते झाले.तसेच बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयामध्ये 4 वर्षांपासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.कलाप्रेमी व दानशूर बाबासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ मा.कृष्णा ढोणे व गजानन बोबडे प्राचार्य बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातो. स्पर्धेसाठी मुंबई,पुणे,संभाजीनगर, जळगाव खान्देश,यवतमाळ,अमरावती ,खिरोदा तसेच अकोला जिल्ह्यातून अनेक कलावंत आपल्या कलाकृती स्पर्धेसाठी व प्रदर्शनीसाठी पाठवतात.तसेच ही स्पर्धा दोन गटांमध्ये राबवली जाते.१) विद्यार्थी गट २)कलाकार गट,या गटांमध्ये एकशे पन्नास कलावंतांनी आपला सहभाग नोंदवला.त्यामध्ये विद्यार्थी गटात श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची विद्यार्थीनी कु.मुक्ता विष्णू वाघ कारंजा लाड तर उत्तेजनार्थ पारितोषिक कु सानवी दिपेद्र वाघमारे नागपूर या विद्यार्थ्यांनी मिळविले पारितोषिकाचे स्वरूप -प्रथम पारितोषिक रोख तीन हजार रुपये,गौरव चिन्ह मेडल व प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ पारितोषिक रोख पाचशे रुपये,मेडल व प्रमाणपत्र असे दोन पुरस्कार व प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.सोबतच प्रा.सारंग शरद नागठाणे संचालक श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावतीचे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी धनंजय मिश्रा (ज्येष्ठ पत्रकार) बाळकृष्ण नगरकर (डीन के के वाघ कॉलेज ऑफ फाइन आर्ट ,नाशिक) सतीश पिंपळे (अकोल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार) प्राचार्य गजानन बोबडे सर ,प्रा.मृण्मयी बोबडे,प्राध्यापिका सुवर्णा नागपुरे प्रा.विशाल वैष्णव आदी उपस्थित होते.तसेच श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती सर्व स्तरातून कौतुक होत आहे माजी खा.अनंत गुढे व आ. बच्चु कडु अमरावतीमधील सर्व कलाकारांचे व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

 साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!