लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान करा, प्रियंका पवार..

0

उत्कृष्ट मतदान नोंदणी बद्दल वर्धा जिल्ह्याला तीन पुरस्कार मिळाले.

देवळी : लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान करण्याची गरज आहे तसेच देशाचे उज्वल भविष्य घडविण्याकरिता मतदान हे महत्त्वाचे आहे.निवडणुकीचे पूर्वतयारी करण्याकरिता दोन वर्षापासून मतदान नोंदणी,नाव दुरुस्त करणे,फोटो टाकणे व इतर दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले असून यादया प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. याकरिता सर्व स्तरावरून परिश्रम घेऊन काम करण्यात आले.यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून १८ वर्ष वय गटातील सर्वांना मतदान करता येणार आहे.तरीही ज्यांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी नाव नोंदणी करावी.याकरिता जनजागृती करण्याचे आव्हान मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.मतदान दिनाचा कार्यक्रम मारिया कॉन्व्हेंट मध्ये आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मतदान नोंदणी अधिकारी प्रियंका पवार अध्यक्षस्थानी होत्या,यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव,गटविकास अधिकारी देहेकर,मुख्याधिकारी नगर परिषद देवळी सौरभ कावळे, माजी नगराध्यक्ष जब्बार तव्वर, मारिया कॉन्व्हेंट प्राचार्य अडकीणे म्याडम,मारिया ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुरसे,नायब तहसीलदार,शकुंतला पारांजे, नायब तहसीलदार अजय झिले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निवडणुकीचे उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या मध्ये डॉ शकुंतला पारांजे,मनोज वंजारी,कैलास बुडगे,निकेश पराचे,गजानन बर्वे,व्ही व्ही भोमले,गेजराज मोरस्कर, सुकेशनी गोंडाने,समीर चोरे,केशव गायधने,वनिता खडसे,दीपक भोगे,बंडू पेटकर,मयूर गावंडे,संकेत भेले,दिनेश भिमनवार,पंकज कौरती,सुमता ओकांर,प्रवीण मेश्राम, यांचा समावेश होता.मतदान दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्रियंका पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की मतदाना करिता इतर देशातील जनतेला खूप प्रयत्न करावे लागले पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच निवडणूक आयोगाची स्थापना होऊन नागरिकांणा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.२१ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना पूर्वी असलेले अधिकार १८ वर्षांवर आणण्यात आले त्यामुळे बहुसंख्य तरुण, तरुणींना आज मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे.आता सर्वांनी आपले कर्तव्य मतदानाचा अधिकाराचा वापर करावा व देशाचे उज्वल भविष्य घडवावे असे सांगितले.यावेळी प्रास्ताविक तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय मतदान दिवसाविषयी व मतदानाचा अधिकार यावर सविस्तर मार्गदर्शन केले.राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन नायब तहसीलदार झिले यांनी मानले.

जिल्ह्याला मिळाले तीन पुरस्कार.

नागपूर डिव्हिजन मध्ये मतदानाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या वर्धा जिल्ह्याला तीन पुरस्कार देण्यात आले.यामध्ये वर्धा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले(जिल्हाधिकारी), निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत,उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग प्रियंका पवार,यांना देण्यात आले.या पारितोषिकामुळे मतदान नोंदणीचे उत्कृष्ट कार्य झाल्याची शासन दरबारी नोंद झाली आहे.यावेळी कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी प्रियंका पवार यांचा सत्कार करण्यात आला.

सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!