वन्यप्राण्याच्या मार्गांवरील मध्यरात्री सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम बंद करा, नाहीतर अस्वलीला जेर बंद करा…

0

🔥वन्यप्राण्याच्या मार्गांवरील मध्यरात्री सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम बंद करा, नाहीतर अस्वलीला जेर बंद करा. 🔥वन्य प्राणी बिथरले, अस्वलीला जे्रबंद करा, तहसीलदार,वन परीक्षेत्र अधिकारी, ठाणेदार यांना निवेदन सादर.

आष्टी शहीद -/ आष्टी ते कारंजा (घा.)येथील वन्य प्राणी ये जा करणाऱ्या मार्गांवर मध्यरात्री सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे वाहणाच्या आवाजाने तसेंच मशीनच्या आवाजाने व बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी भरपूर प्रकाश व्यवस्था असल्यामुळे तसेंच जांब नदीवर पुलाचे व बांधाऱ्याचे काम सुरु असल्याने वन्य प्राणी बिथरले आहेत. दि. 4रोजी पहाटे तीन वाजता एक असवलं पाणी पिण्याच्या शोधात मध्य रात्री बोरखेडी गावात घुसून धुमाकूळ घातला. यामुळे बोरखेडी गाव दहशतीत असून अस्वळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभाग यांच्या सह तहसीलदार यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या बोरखेडी गावात दि. 4फेब्रुवारी रोजी पहाटे अस्वल गावात हनुमान मंदिर जवळ आली आणि लोखंडी गेट धडका मारू लागली. नंतर ती पोलीस उपनिरीक्षक अक्षय भागानगरे यांच्या घरी गेली तिथेही तिने काही वेळ उपड्रॉव केला. तेव्हा गावाकरी जागे झाल्यावर ती गावातील मध्य वसतितुन शेत शिवारात पळून गेली. हा सर्व घटनाक्रम गावकर्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. गावकरी आता अस्वल च्या भीतीने दहशहितीत आहे. दि. 3फेब्रुवारी रोजी सुद्धा तीच अस्वल एका गुरख्याला गावात दिसली होती असे सांगण्यात येते. बोरखेडी हे गाव घनदाट जंगलाला लागून असून येथील वन्य प्राणी पाण्याच्या शोधात जांब नदी पत्रात ये जा करतात.नेमके त्याच ठिकाणी मध्य रात्री काम करण्यात येते. पाळीव प्राण्यांना तसेच वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी येथील पुलाजवळ बांधाऱ्यात पाणी उपलब्ध असते मात्र तेही पाणी उपसा करून बांधकाम करणाऱ्या कंत्राट दारानी चोरून नेले. आजानादेवी वन तलावातून सुद्धा पाणी चोरून नेण्याचा सपाटा सुरु आहे. मध्य रात्री वन्य प्राणी जंगलातून पाण्याच्या शोधात शेत शिवारात येतात नेमक्या त्याच मार्गांवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. काम करीत असलेल्या ठिकाणी मोठे हॅलो जण लाईट लावल्याने वन्य प्राण्यांना समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे येथील वन्य प्राणी आता नागरी वस्तीत धुसून हैदोस घालायला लागले. मध्य रात्री होणारे बांधकाम थांबल्यास वन्य प्राणी गावात येणार नाही अशी चर्चा गावात आहे. वनविभाग, तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देऊन अस्वलीचा बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते वेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटना वर्धा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष भाग्यश्री गणेश चेले, तालुका सचिव सुचिता चांदिवले, गणेश चेले तालुका अध्यक्ष पपीता लोमटे, तालुका उपाध्यक्ष पुंडलिक लोमटे, अमोल भागानगरे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी चांदिवले आदी यावेळी उपस्थित होते.

विकास चौधरी वनपाल
वनविभाग आष्टी
अस्वलीला जेर बंद करण्यासाठी आज पासून बोरखेडी गावातील हनुमान मंदिर जवळ पिंजरा लावण्यात येणार आहे. पिंजरा घेऊन वनविभागाचे वाहन गावात पोहचले आहे. जेर बंद करण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात येणार असून मी स्वतः रात्र भर गस्त देणार आहे.

           नरेश भार्गव                        साहसिक News-/24 आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!