वर्ध्यात २६ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
साहसिक न्युज24
क्राइम प्रतिनिधी/ वर्धा:
शहरातील डेहणकर ले आउट भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने तिच्या राहत्या घरी घरी कोणी नसताना पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे..
निकिता अरुण झाडे(२६) वर्ष राहणार डेहणकर ले आउट असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. निकिता ही आपल्या भावासोबत राहत होती. निकिताच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे .त्यामुळे ती आणि तिचा भाऊ हे दोघेच घरी राहत होते आज सकाळी तिचा भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेला असता तिने संधीचा फायदा घेत घरातीलच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली निकिताचा भाऊ घरी परत आल्यानंतर त्याला हा प्रकार दिसला. त्यांनी लगेच रामनगर पोलिसांना फोन करून माहिती दिली, पोलीस घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविला. निकिताने आत्महत्या का ? केली याचे नेमके कारण वुत्त लिहेस्तोवर कळू शकले नाही.