यवतमाळ -/ कृषी विभागातील कथित गैरव्यवहार, बँकेची आर्थिक फसवणूक, भूखंड घोटाळा आणि राजकीय प्रभावाचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांवरून कथीत चमडीचोर व लुच्छा सतीश मालनवार यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. मुद्रा कर्ज योजनेतील गैरप्रकार आणि माजी मंत्र्यांच्या नावाने केलेली वसुली यांसारखे मुद्दे उघडकीस आल्याने स्थानिक प्रशासकीय व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सतिष मालनवार यांनी कृषी विभागाशी संबंधित कामांमध्ये गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय, शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुद्रा कर्ज योजने’चा गैरवापर केल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुग्ध व्यवसाय (डेअरी प्रकल्प) सुरू करण्याच्या नावाखाली सुमारे २५ लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मंजूर करून घेण्यात आले; मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकल्प सुरू न करता शासनाची आणि बँकेची फसवणूक केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास बँकिंग यंत्रणेतील संगनमतही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ आर्थिक कर्ज प्रकरणांपुरताच हा प्रकार मर्यादित नसून, यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरातील एका भूखंडाशी संबंधित हेराफेरीही उघड झाली आहे. बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून लाखो रुपयांचा भूखंड बेकायदेशीरपणे लाटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भूमी अभिलेख आणि नगररचना विभागातील नोंदींची तपासणी सुरू असून या प्रकरणात महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद मानली जात आहे. या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, राजकीय वरदहस्त असल्याचा आव आणून करण्यात आलेली वसुली होय. माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा गैरवापर करून विविध व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक लाभ मिळवल्याचे आरोप पुढे आले आहेत. उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या नावाचा आधार घेऊन दबाव निर्माण करणे आणि शासकीय कामांमध्ये अडथळा आणणे, असा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. याशिवाय बाभुळगाव परिसरातील नागरिकांनीही त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनाच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्याचे समजते. एकापाठोपाठ एक समोर येत असलेल्या या प्रकरणांमुळे मालनवार यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तक्रारींची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)