शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याचा गंभीर प्रकार शहरातील डॉ.बि.आर.आंबेडकर विद्यालयात उघडकीस आला.

0

खुद्द मुख्याध्यापकांनीच याची तक्रार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली.

हिंगणघाट : काल दि.२७ रोजी स्थानिक डॉ.आंबेडकर विद्यालयात सुमारे ८०८ शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत भात वितरीत करण्यात आला, यात चक्क अळ्या आढळल्या असून ही बाब शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाचे निदर्शनास आणून दिली.
शालेय मुख्याध्यापक गुडधे यांनी याची रीतसर तक्रार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.
काल दि.२७ रोजी दुपार पाळीतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांकरीता शालेय पोषण आहार देण्यात आला,त्या आहारातील भातामध्ये अळ्या आढळून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी तसेच नियमानुसार भोजनाचा आस्वाद घेऊन तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी शालेय प्रशासनाकडे केली.
सदर शालेय पोषण आहाराचा पुरवठा वर्धा येथील विदर्भ युवक सेवा सहकारी संस्थेमार्फत हिंगणघाट येथील केंद्रीय स्वयंपाकगृहातून करण्यात येतो.
या घटनेमुळे विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या या आहाराचे विश्वसनीयतेवरती प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या चिमुकल्या विद्यार्थ्याचे आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.
घटनेची तक्रार शालेय मुख्याद्यापकांनी गटशिक्षणाधिकारी अल्का सोनवणे यांचेकडे केली असून सदर प्रकरणी प्रशासन पोषण आहार पुरवठादार संस्थेवर काय कारवाई करणार याकडे पालक व विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे.

 ईकबाल पहेलवान साहसिक न्युज/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!