सुप्रिया यादव ची राष्ट्रीय कॅम्प करीता निवड.

0

: स्थानिक 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.छात्र सैनिक सुप्रिया यादव हिची निवड 28 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान जळगाव येथे आयोजित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ राष्ट्रीय एकात्मता शिबिराकरीता झालेली असून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे.

सदर शिबिरात युवा नेतृत्व, युवा संवाद, भाषांचे आदानप्रदान, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळांना भेटी व पथ संचालनासह विविध उपक्रमांचा समावेश आहे.कॅडेट सुप्रिया आपल्या यशाचे श्रेय एन.सी.सी.बटालियनचे कमान अधिकारी कर्नल समिक घोष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांना देतात.

अविनाश नागदेवे सहासिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!