स्काऊट व गाईड चळवळीतून चारित्र्यवान पिढी घडते, डाॅ. मंगेश घोगरे.
स्काऊट व गाईड चा 37 वा जिल्हा मेळावा देवळी येथे होणार
देवळी : शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबत शिस्त, स्वावलंबन, साहस, देशप्रेम व चारित्र्य संवर्धन करणारे शिक्षण देणे काळाची नितांत गरज असून या दृष्टिकोनातून स्काऊट व गाईडचा अभ्यासक्रम हा नियोजनबद्ध असून खऱ्या अर्थाने स्काऊट व गाईड चळवळीतून चारित्र्यवान पिढी घडते, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रोव्हर रेंजर सभागृहात आयोजित वर्धा भारत स्काऊट व गाईड जिल्हा संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी तथा स्काऊट व गाईड चे जिल्हा मुख्य आयुक्त डाॅ मंगेश घोगरे यांनी 20 ऑक्टोबर रोजी केले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसोबत स्काऊट व गाईड चा 37 वा. जिल्हा मेळावा आयोजनाबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्य आयुक्त डाॅ मंगेश घोगरे तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतिश राऊत, माजी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, माजी प्राचार्य डॉ. विजय बोबडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले, प्रा. नारायणे, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे व रोव्हरचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी करून स्काऊट गाईड चळवळीबाबत तसेच जिल्हय़ातील स्काऊट व गाईड च्या उपक्रमाबाबत माहीती दिली तर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्काऊट व गाईड च्या जिल्हा मेळावा आयोजनाबाबत माहिती दिली.
या वर्षीच्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे यजमान पद ‘लोकनेते प्रा. सुरेशभाऊ देशमुख अमृत महोत्सव समिती’ घेणार असून सदर मेळावा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. यात 20 प्रकारची अँडव्हेचर ऑबस्टकल, शोभायात्रा, तंबू निरीक्षण, स्किलोरामा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विना भांड्याचा स्वयंपाक हे आकर्षण राहणार आहे. या मेळाव्यात हायस्कूल विभागातील 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून 100 रोव्हर्स व रेंजर्स सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी गाईडच्या पदाधिकारी जिल्हा प्रशिक्षण आयुक्त उर्मिला चौधरी, सहाय्यक जिल्हा आयुक्त निर्मला नंदुरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, स्काऊट मास्टर अभिजीत पारगावकर, जनता हायस्कूलचे उप मुख्याध्यापक सुरेन्द्र उमाटे, मारूती सयाम, याकूब शेख, प्रा. मेघा फासगे, प्रा. निलीमा बर्गट, हेमलता वाडीवे, सुषमा कार्लेकर, रोव्हर संकेत हिवंज
व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक जिल्हा आयुक्त राजहंस जंगले तर आभार सहाय्यक जिल्हा आयुक्त दिपक गुढेकर यांनी केले.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24