स्वतःला ‘ऊर्जामंत्री’ समजणाऱ्या साहेबांची उचलबांगडी! उन्हाळ्यात नोटीस न देताच वीज तोडली, नागरिकांचा संताप नडला; अधीक्षक अभियंत्याची तडकाफडकी बदली

0

🔥हेच ते प्रवीण दरोली स्वतःला ‘ऊर्जामंत्री’ समजणाऱ्या साहेबांची उचलबांगडी!
उन्हाळ्यात नोटीस न देताच वीज तोडली, नागरिकांचा संताप नडला; अधीक्षक अभियंत्याची तडकाफडकी बदली.

यवतमाळ -/ उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होत असताना यवतमाळकरांच्या घरातील ‘लाईट’च घालवणाऱ्या महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना स्वतःचाच ‘फ्यूज’ उडाला. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट पोलिस बंदोबस्तात मीटर उपटण्याची मोहीम राबवणाऱ्या अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांची अखेर तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

🔥नेमक काय घडलं?
यवतमाळ शहरात पारा 45 अंशांवर गेला असतानाच महावितरणने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे, नागरिकांना नोटीस, सूचना, काहीही न देता थेट पोलिसांना घेऊन कर्मचाऱ्यांचे पथक घरोघरी पोहोचले आणि मीटरच काढून नेले. परिणामी लहान मुले, वृद्ध, आजारी नागरिकांना भर उन्हाळ्यात अंधारात आणि घामाघूम राहावे लागले.

🔥तक्रारींचा ‘खचं ’ आणि दुर्लक्ष.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारींचा ‘खचं ’ यवतमाळ वीज वितरण कार्यालयात साचत पडला असून अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. जास्त बिल, वारंवार बिघाड, अघोषित लोडशेडिंग या समस्यांवर ‘वरिष्ठांकडे पाठवले’ एवढेच उत्तर मिळत होते, मात्र कार्यवाही शून्य होती.

🔥‘साहेब’ ऐकेचनात!
नागरिकांच्या तक्रारी, विनंत्या, अडचणी ऐकून घेण्याऐवजी ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’ असा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप अधीक्षक अभियंता दरोली यांच्यावर होत होता. स्वतःला ‘ऊर्जामंत्री’च समजत असल्यासारखा त्यांचा व्यवहार होता, अशी चर्चा महावितरण वर्तुळातच रंगली होती. कोणाचेही ऐकायचे नाही, एकघाव दोन तुकडे करायचे, या कार्यपद्धतीमुळे नागरिकांत प्रचंड रोष खदखदत होता.

🔥आणि ‘करंट’ लागला
नागरिकांचा उद्रेक शिगेला पोहोचलेला असतानाच वरिष्ठ पातळीवरून दरोली यांच्या बदलीचे आदेश धडकले. ‘उशिरा का होईना न्याय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत यवतमाळकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दोन दिवस कारवाईचा धडाका आणि तिसऱ्या दिवशी साहेबांचाच ‘शॉक’ लागल्याने जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

‘नोटीस न देता लाईन तोडणे’ आणि ‘वर्षानुवर्षांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे’ दरोली यांना महागात पडले असून, ‘मनमानी’ला ‘ब्रेकर’ लागल्याने नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

           ब्युरो रिपोर्ट साहसिक             News-24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!