🔥माजी खा.रामदास तडस यांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन, इफ्तार पार्टीला ४० वर्षाची परंपरा.
देवळी -/ देशाच्या विकासाकरिता देशातील सर्वधर्माच्या समाज बांधवाची एकजूट असणे अत्यंत गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात जास्त मुसलमान शहीद झाले. देवळीतील मुसलमान समाजातील नागरिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसर होते याची स्वतंत्र लढ्यामध्ये नोंद आहे. देवळी मध्ये सर्व समाजातील नागरिक एकजुटीने राहतात ही एक येथील परंपरा आहे.देवळी मध्ये मुस्लिम समाज जास्त नसतांनासुद्धा येथील मुस्लिम बांधवांना सुद्धा नगराध्यक्षपदी विराजमान करण्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका रहालेली आहे.देवळी मध्ये भाई चारा कायम असून तो सर्वांनी टिकवलेला आहे सर्वात जास्त दान धर्म मुस्लिम बांधव रमजान महिन्यामध्ये करतात मी नगराध्यक्ष झालो तेव्हापासून मी इफ्तार पार्टीचे आयोजन सुरू केले याला चाळीस वर्षे झाले असून ही परंपरा कायम ठेवून सर्वांनी एकत्रित राहून आदर्श जीवनशैली अंगीकारावी असे माजी खा.रामदास तडस यांनी इतर पार्टीच्या समारोपिय कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जामा मस्जिद चे इमाम फैजान रजा,मोहम्मदिया मज्जिदचे हाफिद खान, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, हबीब खा पठाण,मोहमद साजिद खान,माजी नगराध्यक्ष अब्दुल जब्बर तव्वर,अयुब अली पटेल,शेख जुम्मेद ठेकेदार,अब्दुल हमीद शेख समीर,शेख अजीज,शेख सत्तार,यांच्यासह प्रमुख उपस्थिती होती.
जामा मस्जिद चे इमाम फैजान रजा यांनी यावेळी आपल्या भाषणात मन्युशामध्ये माणुसकी असणे गरजेचे आहे माणुसकी नसेल तर तो मनुष्यच नाही आमच्या मोहम्मद पैगंबर यांनी आदर्श जीवन शैली प्रत्येक पुरुषाने अंगीकारून सुखी जीवन जगण्याचा व सर्वांनी एकत्रित मिळून आनंदाने जीवन जगण्याची शिकवन दिली आहे. ते सर्वांनी अंगी करावी.यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश कामडी, नरेंद्र मदनकर,रवी करोटकर,गणेश शेंडे,इत्यादीनी प्रयत्न केले.