हिंगणघाटात फेरीवाल्याने चक्क भाजीपाला नालीच्या पाण्यात धुतला…
By साहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
फेरीवल्याकडून भाजीपाला विकत घेत असाल तर थोडं थांबा…. नागरिकांच्या जीवाशी खेळ तर करत नाही ना…वर्ध्यातील हिंगणघाट शहरातील मनसे चौकात चक्क फेरीवाला नाल्याच्या पाण्यात भाजीपाला धुवत असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेय… सध्या पावसाळ्याचे दिवस आहेय…यात शहरातील नाल्याना पाणी वाहत असते…अश्यातच शहरात भाजीपाला विक्रेत्याकडून चक्क नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहेय… आज दुपारच्या सुमारास एक भाजीपाला विक्रेता नालीच्या पाण्यात कोथिंबीर धुवत असताना व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहेय….पावसाळ्याच्या दिवसात गल्लीबोळात भाजीपाला विक्रीला येतोय…त्यांच्यावर विश्वास ठेवून नागरिक भाजीपाल्याची खरेदी केली जातेय…मात्र हा भाजीपाला जर नालीच्या पाण्यात धुवत असेल तर किती विचित्र प्रकार म्हणावं लागेल.. आता ह्या भाजीपाला विक्रेत्यावर काय प्रशासन कारवाई करते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहेय…