हिंगणघाट ट्रक मोटर मालक संघाच्या वतीने स्टेरिंग छोडो आंदोलन..

0

नवीन हिट अँड रन कायदा रद्द करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी.

हिंगणघाट, शासनाने लागू केलेला “हीट अँड रन कायदा” रद्द करण्यासाठी काल दि.१० जानेवारीपासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गावरील स्थानिक नांदगाव चौकात हिंगणघाट ट्रक मोटर मालक संघाचे वतीने बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सदर आंदोलनामुळे कालपासूनच शहरात ट्रक तसेच खाजगी बसेस वाहतूक संपूर्णपणे बंद होती.
स्थानिक नांदगाव चौक येथे मोटर मालक तसेच चालकांनी धरणे दिली. यावेळी हिंगणघाट ट्रक मोटर मालक संघाच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांना सदर कायदा रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट शहरात काल सकाळपासूनच खाजगी ट्रॅव्हल सेवा बंद करण्यात आली होती, हिंगणघाट येथून बाहेरगावी जाण्याकरिता प्रवाशांनी हिंगणघाट बस स्थानकावर एकच गर्दी केली, विशेषतः नागपूर जाण्याकरिता प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला.
आज दुसऱ्या दिवशी खाजगी ट्रॅव्हल बस सेवा बंद होती,परंतु दुपारनंतर तुरळक प्रमाणात खाजगी बसेस प्रवासी वाहतूक करताना दिसून आल्या.नवीन मोटर वाहन जाचक कायद्याचा विरोध करताना तालुक्यातील वडनेर येथील राष्ट्रीय महामार्गावरील आजनसरा चौकातही कालपासून धरणे देण्यात आली, आज दिनांक ११ रोजी सुद्धा स्टेरिंग छोडो आंदोलनांतर्गत ट्रक मालक व चालकांनी वाहतूक बंद केली होती, ठाणेदार संजय मिश्रा यांनी हस्तक्षेप करीत वाहतूक सुरळीत केली.

 

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!