हिंगणघाट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले गौ-तस्करीचा ट्रक
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /हिंगणघाट
नागपुर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग वरील हिंगणघाट या मध्यस्थानी वना नदी वरील पुलाजवळ अवैधरित्या गौ-तस्करीचा ट्रक नगरसेवक सौरभ तिमांडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रात्री ०२ वाजता पकडण्यात आले असून २० जनावरांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.ज्ञयामध्ये २४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ०४ लाख रुपयाचे २० गाय बैल व २० लाख रुपयाचा ट्रक यामध्ये समाविष्ट आहे. जनावरे हे स्थानिक गौरक्षण हिंगणघाट येथे सुखरूप उतरवण्यात आले व ट्रक पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.अवैधरित्या विनापरवाना ताडपत्री झाकून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले. नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी नुकत्याच काही दिवस आगोदर जाम-हिंगणघाट-वडनेर या राष्ट्रीय महामार्गावरून होत असलेली गौ-तस्करी थांबविण्या बाबतचे निवेदन दिले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा जनावरांचा ट्रक पकडण्यात आला परंतु त्यावेळी ट्रक ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितल्यावर त्याने गाडीचा वेग अधिक वाढवून गाडी अंगावर आणण्याचा प्रयत्न केला आणि भरधाव वेगाने समोर निघाला कार्यकर्ते या अनपेक्षीत हल्ल्यामुळे घाबरून न जाता त्या ट्रकचा पाठलाग करू लागले व ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांनी पुन्हा गाडीला चिरडण्याचा प्रयत्न केला अखेर जीवावर उदार होऊन गौ-मातेचे प्राण वाचविण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यश आले व पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ट्रक चालकाला सुद्धा ताब्यात घेतले असता पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ०२ ट्रक चालक फरार झाले व त्या जनावरांच्या ट्रका सोबत असलेले आणखी ०२ ट्रकांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे पसार झाले व ०१ ताब्यात घेण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनावरांची होत असलेली तस्करीचे ट्रक पकडले असता पोलिसांच्या वतीने त्यांना धमकावण्यात आले की जनावरांच्या तस्करीचे ट्रक तुम्ही पडल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल यावरून गौ-तस्करी व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने गौ माफियांचे बळ वाढल्याची चिन्हे जाम-हिंगणघाट-वडनेर क्षेत्रातून धावणाऱ्या अवैध वाहतूकी वरून स्पष्ट दिसून येत आहे.जाम चौरस्त्यावर पोलीस चौकी असतानासुद्धा जनावरांच्या तस्करीचे ट्रक सोडल्या जाते मात्र यात पोलिसाची भूमिकाच कत्तल खान्यातील कसाया सारखी भासणारी ठरत,आहे याचेच मोठे आश्चर्य ! भर दिवसा गौ-तस्करीचे दिवस-रात्र १० ते १५ ट्रक काढत असल्याची माहिती मिळाली आहे.जनावरांची अवैध वाहतूकनेमकी कोणाच्या आशीर्वादाने? येथे जाम-हिंगणघाट-वडनेर पोलीसांची भूमिकानेमकी कोणाच्या बाजूने? जर पोलिसांच्या आशीर्वादाने तस्करी साधली जात असेल तर वर्धा जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेची गुप्त यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी? कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनाच गौवंश-रक्षा आणि पशु संरक्षण कायदाचा विसर पडला की काय?असे चित्र स्पष्ट जनतेला दिसत आहे.
हिंगणघाट येथील सिंधुबाई बीजवार, गजानन माउस्कर,बालू वाडकर, रामचंद्र चीलनकार, जगन्नाथ प्रजापति, राजीव डुकरे यांच्यासह इंदिरा गांधी-गोमाजी वार्डातील व गांधी वार्डातील मनोज जोशी या सर्व दूध व्यवसायिक तसेच ३० मे २०२२ला बोकडधोगडा या गावातील शेतकरी विठ्ठक लडी यांचे तीन बैल शेतातून चोरी गेल्याची अशा अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला असून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई पोलिस प्रशासनाच्या वतीने केलीली नाही. या गौ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून कारवाई करण्याची सुद्धा त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे.
पण वर्षानुवर्ष हजारो जनावरांचे प्राण वाचून सुद्धा शेवटी आरोपी आणि कसाई यांच्या वर कुठलीही कठोर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे चक्क राष्ट्रीय महामार्गाने मोठ मोठ्या ट्रक मधे कोंडून गौ-तस्करी खुलेआम सुरू आहे. आज सुद्धा गौ हत्या बंदीचा कायदा असून रोज गाईची कत्तल सुरू आहे. यात प्रशासनाने जातीने लक्ष घालावे अशी मागणी नगरसेवक सौरभ तिमांडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस स्टेशन हिंगणघाट पी.एस.आय मुंडे करत आहे.यावर काय कार्यवाही होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र- तेलंगांना – आंध्रप्रदेश असा गौ-तस्करीचा प्रकार अनेकदा घडतो आहे. कधी पायदळ तर कधी मोठ मोठ्या ट्रकने ही तस्करी होते. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसतांना अगदी जनावरे मरे पर्यंत हा जीवघेणा प्रकार घडतो आहे. त्यामुळे गौ-रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून हे गौ बचावाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अश्या अवैध गौ-तस्करांच्या मुस्क्या आवळणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी जाम पोलीस चौकी,पोलीस स्टेशन अंतर्गत सरकारी दवाखाना चौक हिंगणघाट, पोलीस स्टेशन वडनेर येथे नाका-बंदी करण्याचे आदेश सरकारने द्यावे अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे सह गौरव तिमांडे, सुमित राऊत,गौरव घोडे,निखिल वदनलवार,राहुल रेवातकर,अमोल त्रिपाठी,राहुल कोळसे,युवराज माऊसकर,रितू मोघे, शुभम पिसे,आदर्श त्रिवेदी,अमोल तडस,अक्षय भगत,अमित तुराळे,नितीन उघडे,पवन काकडे,हर्षल तपासे इत्यादी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.