🔥घनदाट जंगल व्याप्त भागातील पिलापूर येणाडा गावातील पहिला विध्यार्थी होणार सैन्यात दाखल.
🔥शेख अवेज पीर महम्मद यांचा गावकर्यांनी केला गुण गौरव.
आष्टी शहीद -/आष्टी तालुक्यातील घनदाट जंगल व्याप्त पिलापूर (येणाडा )गावातील आटो चालक पीर म्हहमद यांचा लहान मुलगा शेख अवेज हा सीमा सुरक्षा दलाच्या झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून तो नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत त्याचे नाव आहे. सीमा सुरक्षा दलात पिलापूर (येणाडा )गावातील मुलगा दाखल होणार ही वार्ता गावात पसरताच गावातील नागरिकांना आनंदाला पारावार उरला नाही.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातील घनदाट जंगल व्याप्त अश्या पिलापूर (येणाडा )गावातील रहिवाशी शेख पीर महम्मद यांच्या कडे शेती नसून भूमिहीन परिवार आहे. पिलापूर व येणाडा ही दोन्ही गावे लागून आहे. दोन मुले व एक मुलगी व पत्नी आई असा परिवार असताना गावात एकच कुटुंब मुस्लिम समुदायचे आणि गावात आदिवासी, गोवारी, कुणबी, बौध्द, या समाजाचे नागरिक गावात असताना सर्वाशी हसत खेळत मैत्री भावात संबंध निर्माण करून त्यांनी उपजिवेकेचे साधन म्हणून आटो व्यवसाय सुरु केला. लहान पणा पासून लहान मुलगा शेख अवेज हा शिक्षणात जिद्दी होता. दहावी पर्यंत त्याने आष्टी या शहरात शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी त्याने नरखेड गाठले तेथून पुढे अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि खूप परीक्षा दिल्यावर त्याला दि. 15जानेवारी 2026रोजी निकाल आला त्यात गुणवत्ता यादीत असल्याचे सांगण्यात आले. ही वार्ता वडील पीर महम्मद यांना देण्यात आली. पीर म्हहमद यांनी मुलाच्या मेहनतीचे फळ अशी उपमा दिली.
आटो चालवून परिवाराची उपजीविका करणाऱ्याचा मुलगा आता सैन्यात दाखल होणार असून आई व वडिलांना त्याचा अभिमान आहे. सैन्यात दाखल होणारा तो गावातील पहिलाच मुलगा आहे. गावाकर्यांनी शेख अवेज यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी आष्टी व्यापारी संघांचे अध्यक्ष तसेंच आष्टी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सोनू भार्गव, अन्याय निवारण समिती चे तालुका अध्यक्ष प्रा. बी. टी. उरकुडे. हुतात्मा चे सेवानिऊत्त प्राचार्य सय्यद अफसर अली,पेठ अहमदपूर चे माजी सरपंच शेख युसूफ, पत्रकार सरांक्ष्ण समितीचे तालुका अध्यक्ष शिवाजी चंदीवाले यांनी पिलापूर येथील माजी सरपंच सौं. वर्षा महादेव सायरे, लीलाबाई नेहारे, रुपाली सायरे, सदाशिव सायरे, महादेव सायरे यांनी पुष्प गुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले.