🔥खडकी येथील नागपुरे परिवाराची लेक होणार भारतीय सैन्यात दाखल,गावकर्यांनी केला तिचा गुण गौरव…
आष्टी शहीद -/ दिनांक 15 1 2026 रोजी बीएसएफ चा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये खडकी येथील दिव्या विनोदराव नागपुरे येणे परीक्षा पास करून सगळ्यांना अचंबित केले घरी आई-वडिलांचे छत्र नसताना घरची खूप अनाथ हालाखीची परिस्थिती असताना आपल्या जिद्दीचे आणि मेहनतीच्या भरोशावर तिने या संपादन केले यात फक्त तिला तिच्या भावाची आणि तिच्या अकॅडमी मधील बाबळे सर यांची साथ व योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तिने हे यश संपादन केले यात शेवटी गावकरी ही मागे न राहता जेव्हा ती मुलगी परीक्षा पास करून प्रथम गावात आली तेव्हा तिला मुख्य चौकात तिचा सत्कार करून एका गाडीवर बसून डीजे च्या आवाजात सर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढून व सर्व गावकऱ्यांनी तिचा औक्षवंत करून घरोघरी ओवाळून तिचं स्वागत केलं व भव्य असा सत्कार केला या सत्काराला विधानपरिषदेचे आमदार श्री दादाराव के चे तळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री मंगेश भोयर नागपूरे -कुटुंबाचे कुटुंब प्रमुख श्री शंकरराव नागपुरे गावातील पोलीस पाटील मंगेश नागपुरे व तिचे सर्व नातलग कुटुंब मंडळी व गावकरी मंडळी व आजूबाजूच्या तिच्या वर्गात शिकणारी लहानपणची मंडळी तिच्या स्वागताला व सत्काराला उपस्थित होती दीक्षा सात वर्षाची असताना तिचे वडील कॅन्सर या रोगाने मरण पावले आई 14 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक मरण पावली परंतु आईचा आशीर्वाद आणि तिची मेहनत आणि मुख्य म्हणजे तिच्या भावाची साथ आणि योग्य मार्गदर्शन याच्या बळावर तिने हे यश संपादन केले घरात वडील वारल्यानंतर आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आईने दोन्ही टाईम शेतीच्या कामाला जाऊन मुलीचे स्वप्न मोठे करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि मुलीने सुद्धा आपल्या आईची मेहनत पाहून जिद्दीने आपल्या मेहनत करून यश संपादन केले हा सगळा सोहळा चालू असताना ही मुलगी जेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या फोटोसमोर आली तेव्हा ती खूप रडली तिच्या अश्रू अनावर झाले तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या कंठ दाटून आला तेव्हा सर्व भावनिक वातावरण तयार झाले होते परंतु तिने गावासाठी तरुणपणात सर्व तरुण मुलांसमोर जो आदर्श निर्माण केला तो खरच कौतुकास पात्र आहे दीक्षा येणे तिच्या सत्कारास उत्तर देताना तिचा भाऊ श्रीकांत नागपुरे तिचे मामा मामी व तिच्या काकूला व चाणक्य अकॅडमी वरुड यांचे संचालक नरेश बांबल आणि वानखडे फिजिकल अकॅडमी अमरावती चे संचालक वानखडे सर व तिच्यावर प्रेम करणारी गावकरी मंडळी यांना देते.