देवळी -/ घटना सविस्तर अशी की देवळी येथे राहणाऱ्या गजानन किशोर पाटणकर ( वय वर्षे ४२) यांचे आरोपी यांच्यासोबत मोहित ढाबा येथे सिगारेट पिण्याचे वादावरून किरकोळ भांडण झाले होते.त्यावरून यातील मृतक हा त्याचा मित्र सोडण्याकरिता इंदिरानगर देवळी येथे गेला असता यातील आरोपी अमन संतोष टेकाम,ओम रमेश सावरकर,प्रणय ज्ञानेश्वर राठोड,मनोज ज्ञानेश्वर राठोड,नयन दीपक मेंढे,या सर्वांनी एकत्र येऊन मृतक गजानन यांना रात्री एकटे गाठून आरोपीने मृतकास चाकूने मारून व त्यास इतर आरोपी यांनी पकडून हत्या केली. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून स्थानिक पोलीस स्टेशन देवळी येथे सर्व आरोपी यांच्यावर सह कलम सह अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.(क्रमशः)