मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जीपणा; वर्ध्यात BLO विरुद्ध गुन्हा दाखल

0

🔥मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जीपणा; वर्ध्यात BLO विरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा -/ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-2026) मोहिमेदरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वर्धा शहरातील एका बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

               भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३० जून २०२६ पासून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून, त्याअंतर्गत Enumeration Form Collection, Digitization आणि Distribution ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या मोहिमेत ४७-वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक २७० चे BLO म्हणून कार्यरत असलेले नरेश रेवते (कर संकलक, नगर परिषद, वर्धा) यांनी कामात हलगर्जी केल्याचे निदर्शनास आले.

              निवडणूक विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना तीन वेळा नोटीस बजावून खुलासा मागविला होता. मात्र, त्यानंतरही आवश्यक सुधारणा न झाल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३२ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ अन्वये वर्धा शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी दीपक कारंडे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आयोगाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नियुक्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!