🔥श्री संत मुंगसाजी महाराज यांचे मूळ अस्थी दर्शन व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळाचे आयोजन.
🔥मुंगसाजी महाराज यांच्या मूळ अस्थी दर्शनाचा भक्ताना मिळणार लाभ.
आर्वी,प्रतिनिधी/(राजू डोंगरे)
आर्वी -/ येथील श्री संत मुंगसाजी माऊली देवस्थान (राणे लेआउट ) शिरपूर रोड येथे श्री मुंगसाजी महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या गुरुवार दिनांक २३/०४/२०२६ ला संपन्न होणार आहे .
आज दिनांक २२ /०४/२०२६ रोज बुधवार ला सकाळी श्री मुंगसाजी माऊली यांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा व दिंडी डॉ. रिपल राणे (राणे हॉस्पिटल) साई नगर आर्वी, येथील त्यांच्या निवासस्थानावरून काढण्यात आली तसेच दुपारी ११ वाजता मूर्तीचे शिरपूर रोड मंदिर प्रांगण येथे भक्तीमय वातावरणात आगमन झाले , दुपारी १२ वाजता पासून जलधिवास, पुष्पधिवास, धान्यधिवास, वस्त्रधिवास या विधी पार पडल्या तर सायंकाळी ६ वाजता भजन सेवा व आरती चे आयोजन करण्यात आले.
दि. २३/०४/२०२६ गुरुवारला ला सकाळी ६ वाजता पूजा विधी प्रारंभ होणार असून दुपारी वाजता माऊलीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ,माऊलीच्या मूळ अस्थीचे दर्शन , कळस स्थापना व सायंकाळी ६ वाजता भजन सेवा व महाआरती चे आयोजन करण्यात आले .
आहे या प्रसंगी महालक्ष्मी भजन मंडळ आर्वी तर्फे भजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मुंगसाजी महाराज देवस्थान आर्वी तर्फे डॉ. रिपल राणे यांनी केले आहे.