🔥देश स्तरावरील परिवर्तनवादी लोकशाही विचारांचे प्रमुख कार्यकर्ते व नेते सहभागी होणार.
🔥येत्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकीमधील कार्य-योजनवर बैठकीत चर्चा होईल.
वर्धा -/ राष्ट्रीय स्तरावर भा. रा. कॉंग्रेस चे नेते माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मिर पर्यत पहिल्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या हजारो नागरिक व परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यानी भारत जोड़ो यात्रा संपताच एकत्र येऊन देशातील लोकशाही व भारतीय संविधान वाचवण्यासाठी व्यापक अभियान फेब्रुवारी 2023 पासून सुरू केले.
2024 मधे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना पूर्ण देश सामोरा जाणार होता. त्या आव्हानाला भिडण्यासाठी व लोकशाही – संविधान विरोधी शक्तीना म्हणजेच भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी हे अभियान देशभर राबवण्यात आले.
एकाच वर्षात देशातील 156 लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करीत कामाची आखणी करण्यात आली. हजारो कार्यकर्ते यात गेले वर्षभर रात्रंदिवस एक करून झटले. या ऐतिहासिक निवडणुकीत भाजपला सत्तेतून हटवता आले नाही , तरी मोदी शाह भाजपा च्या बेलगाम कारभाराला बर्याचअंशी आळा बसवता येईल इतकी ताकद आता विरोधी पक्षांनी कमावली आहे.या विजयात भारत जोडो अभियान व त्या सारख्या अनेक आघाड्यांचे मोठे योगदान आहे.या विजयातील योगदानाचे, सहकारी साथींचे कौतुक करण्यासाठी, तसेच या निवडणुकीतील यशा-पयशाचे विश्लेषण करण्यासाठी व पुढील कामाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय संमेलन 8 व 9 जुलै 2024 रोजी यात्री निवास, बापू कुटी परिसर, सेवाग्राम आश्रम,वर्धा येथे होत आहे.या संमेलनात विविध राज्यांतील प्रतिनिधी आपले अनुभव व विश्लेषण मांडतील. तसेच तज्ञ,मान्यवर आपले विचार मांडतील.या संमेलनात भारत जोड़ो चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव, विजय महाजन, राष्ट्रीय सचिव कविता कुरुघंटी, महाराष्ट्र संयोजिका उल्का महाजन, संजय मं गो, महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी , जेष्ठ विचारक रूपरेखा वर्मा, गणेश देवी, अजित झा , प्रतिभा शिंदे , अविक शहा तसेच भारत जोड़ो अभियान व लोकशाही मुल्य जोपासणारे विविध राज्यांतील प्रमुख 200 च्या वर साथी यात सहभागी होणार असून त्यात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार Ours असे प्रसिद्धीस पिकातूनअविनाश काकडे . वर्धा लोकसभा समन्वयक भारत जोड़ो अभियान यांनी निवेदनातून दिले.