ही छायाचित्रे पाहताना आज मन खूप भरून येते… तेव्हा दादांनी हसत म्हटलं होतं, “आज आपण समीरच्या गाडीतून जाऊया.”

0

🔥ही छायाचित्रे पाहताना आज मन खूप भरून येत.🔥तेव्हा दादांनी हसत म्हटलं होतं,“आज आपण समीरच्या गाडीतून जाऊया.”

थोड्याच वेळात एक पोलीस अधिकारी आला आणि आदराने म्हणाला, “दादा, ही गाडी तपासलेली नाही. प्रोटोकॉलनुसार आणि आपल्या सुरक्षेसाठी वाहन तपासणी आवश्यक आहे.”
दादांनी त्या अधिकाऱ्याकडे पाहून हलकंसं स्मितहास्य केलं…
आणि माझ्याकडे वळून अगदी आपुलकीने म्हणाले,
“समीर, चल… आपण जाऊया.”

त्या दिवशी मी स्वतः वाहन चालवत होतो आणि माझ्या शेजारी राज्याचे उपमुख्यमंत्री, आदरणीय अजितदादा पवार बसले होते. इतका मोठा नेता, पण स्वभावात साधेपणा, बोलण्यात आपुलकी आणि चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास.
लहानपणापासून ज्यांना पाहत आलो, ज्यांचे नेतृत्व अनुभवत आलो, त्यांच्यासोबत असा क्षण अनुभवायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच होते.

काल जेव्हा त्यांच्या विमान अपघाताची आणि निधनाची बातमी आली, तेव्हा अक्षरशः मन सुन्न झाले. बालपणापासून ज्यांना पाहत, ऐकत आणि नेतृत्व करताना अनुभवत आलो, ते अजितदादा आज आपल्यात नाहीत… ही जाणीव अजूनही स्वीकारता येत नाही.

आयुष्यातील हा क्षण माझ्यासाठी केवळ एक आठवण नाही, तर अभिमानाचा, शिकवण देणारा आणि कायम मनात राहणारा अनुभव आहे. कणखर, स्पष्टवक्तेपणा, वेळेचे काटेकोर पालन, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख — हे दादांचे गुण कायम स्मरणात राहतील. असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि नेतृत्वाची उणीव नेहमीच जाणवत राहील.
आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा सदैव मनात जिवंत राहील.
दादा, तुम्ही नेहमीच आठवणीत राहाल…
भावपूर्ण श्रद्धांजली🙏

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!