रायपूर -/पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18/05/2026 रोजी ग्राम अंत्रीकोळी ता. चिखली जि. बुलडाणा येथे गोपनीय माहितीच्या आधारे पंचासमक्ष आर्म अॅक्टप्रमाणे रेड कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान आरोपी 1) शुभम सागर पवार रा. कारला चौक, वर्धा जि. वर्धा, 2) रुपेश मिलन शिंदे व 3) रोहेल मिलन शिंदे राहणार हसनाबाद ता भोकरदन जि जालना हमु पाचोरा जि जळगाव यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, चार मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेली काडतुसे, एक लोखंडी चाकू, महिंद्रा कंपनीचे XUV500 वाहन क्रमांक MH 20 DJ 8687 तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण अंदाजे 7,05,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून अप क्र. 92/2026 अन्वये कलम 3, 5, 7, 25 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस स्टेशन रायपूर ठाणेदार निलेश सोळंके,पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव, पोका अनंत कळमकर, पोका अख्तर शेख, पोका लक्ष्मण शिंदे, चालक पोहवा सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक अकोला यांनी संयुक्तपणे पार पाडली.सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार निलेश सोळंके पोकाॅ लक्ष्मण शिंदे करत आहे.