🔥हाच तो कुख्यात आर्थीक घोटाळा तसेच परवाना असल्याच्या नावाखाली जुगार भरविणारा शिवा तिवारी🔥जिल्हाधिकारी विकास मीना साहेब या भूखंड चे श्रीखंड खाणाऱ्या शिवा च्या मुसक्या आवळतां येइल तर बघा जरा

🔥गुन्हेगारीचा बादशहा शिवा तिवारीचा ‘रिफॉर्म क्लब’ की जुगाराचा अड्डा? जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मंजुरीवर यवतमाळकरांचा रोखठोक सवाल!

🔥भूखंड घोटाळेबाज शिवा तिवारीच्या जुगार क्लबवर यवतमाळ पोलिसांची मेहेरनजर; 

🔥रोज लाखो रुपयांची लूट, पोलीस अधीक्षक कारवाईचा धुरळा उडवणार का?

यवतमाळ -/ ​यवतमाळ शहरात गुन्हेगारीचा बादशहा अशी कुख्याती असलेल्या शिवा तिवारी याच्या ‘रिफॉर्म क्लब’च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. भूखंड घोटाळ्यात जेलची हवा खाऊन बाहेर पडलेल्या या सराईत गुन्हेगाराला थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशाने परवानगी मिळाली का, असा संतप्त सवाल आता यवतमाळकर विचारत आहेत. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या अड्ड्यावर पोलीस प्रशासनाची नेमकी काय मेहेरनजर आहे, असा रोखठोक प्रश्न उपस्थित होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक या जुगारी साम्राज्याचा धुरळा उडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हेगारी जगतात स्वतःचे वर्चस्व निर्माण करू पाहणारा आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला कुख्यात गुन्हेगार शिवा तिवारी पुन्हा एकदा यवतमाळच्या कायदा व सुव्यवस्थेला उघड आव्हान देत मैदानात उतरला आहे. कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यात मध्यवर्ती कारागृहाची हवा खाऊन नुकताच बाहेर आलेल्या शिवा तिवारीने आता ‘रिफॉर्म क्लब’च्या गोंडस नावाखाली शहरात जुगाराचा महाअड्डा थाटला आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या नाकाखाली सुरू असलेल्या या अड्ड्यामुळे संपूर्ण शहरातील शांतता धोक्यात आली असून, पांढरपेशा गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

​स्थानिक नागरिकांमध्ये सध्या सर्वात मोठी चर्चा हीच आहे की, ज्या व्यक्तीवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, अशा सराईत गुन्हेगाराच्या क्लबला जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या स्वाक्षरीने किंवा कार्यालयाकडून अधिकृत परवाना मिळाला तरी कसा? की परवान्याच्या नावाखाली प्रशासनाची दिशाभूल करून ही उघड लूट सुरू आहे? या प्रश्नाने संपूर्ण यवतमाळच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

​शिवा तिवारीचा इतिहास हा केवळ जुगारापुरता मर्यादित नसून तो मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचा सूत्रधार राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंड हेराफेरी प्रकरणात त्याला तुरुंगात जावे लागले होते. एका नामांकित बँकेचे आणि सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये त्याने हडप केले होते. नियम आणि कायद्यानुसार ही रक्कम वसूल होणे अपेक्षित असताना, तपासात मोठी आर्थिक देवाणघेवाण करून हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आले.

​या प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन तपासात ज्या पोलीस अधिकाऱ्याने शिवा तिवारीला कोट्यवधी रुपयांची अफरातफर लपवण्यासाठी मदत केली, तो अधिकारी आता सेवेतून निवृत्त झाला आहे. खाकी वर्दी उतरवल्यानंतर या महाशयांनी थेट शिवा तिवारीच्या ‘रिफॉर्म क्लब’मध्ये अधिकृत भागीदार (पार्टनर) म्हणून प्रवेश केला आहे! वर्दीत असताना गुन्हेगाराला वाचवायचे आणि निवृत्त झाल्यावर त्याच्याच अवैध धंद्यात बसून मलिदा लाटायचा, असा हा किळसवाणा प्रकार अवधूतवाडीच्या हद्दीत उघडपणे सुरू आहे. खाकी आणि गुन्हेगारीच्या या अभद्र युतीमुळे पोलिसांची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे.

​क्रीडा आणि मनोरंजनाचा परवाना असल्याचा आव आणणाऱ्या या रिफॉर्म क्लबमध्ये प्रत्यक्षात मात्र हाय-प्रोफाइल जुगार खेळवला जात आहे. शहरासह संपूर्ण विदर्भातील नामांकित सट्टेबाज, व्यावसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या क्लबमध्ये दररोज हजेरी लावतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार:

​७ ते ८ लाखांची थेट टेबल फी (कट्टा): केवळ खेळ मांडण्यासाठी आणि जागा देण्यासाठी क्लबचा चालक शिवा तिवारी दररोज तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचा ‘कट्टा’ (नाल) गोळा करतो.

 या रोजच्या मिळणाऱ्या लाखोंच्या रकमेतून स्थानिक पोलीस ठाणे, तपास यंत्रणा आणि पांढरपेशा मध्यस्थांचे खिसे दरमहा कोट्यवधी रुपयांच्या हप्त्यांनी भरले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

​शासनाचे सर्व नियम, अटी आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून हा क्लब २४ तास धडधडत आहे. सर्वसामान्य माणूस साध्या नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा त्याच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करणारी यंत्रणा, शिवा तिवारीच्या या रोज लाखो रुपये लुटणाऱ्या कारखान्यापुढे पूर्णपणे लाचार आणि हतबल झाल्याचे चित्र आहे. ​हा क्लब सुरू झाल्यापासूनच शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अशा वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या क्लबची परवानगी कशी दिली, हा कळीचा मुद्दा आहे. ​गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी (Police Verification) न करताच परवाना नूतनीकरण किंवा मंजुरी दिली गेली का? जर जिल्हा प्रशासनाने केवळ टेबल गेम्स किंवा मनोरंजनासाठी परवानगी दिली असेल, तर तिथे चालणाऱ्या जुगारावर महसूल आणि पोलीस विभाग धाडी का घालत नाही? प्रशासनाने यावर तात्काळ खुलासा केला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरही संशयाची सुई वळल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा शहरातील सजग नागरिकांनी घेतला आहे.

​यवतमाळ शहर सध्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकले आहे. अवधूतवाडी पोलिसांचे हात या क्लबच्या मलिद्याने बांधले गेल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, आता संपूर्ण यवतमाळकरांच्या नजरा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. ​जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पोलीस अधीक्षक शिवा तिवारीच्या या हायटेक जुगार अड्ड्यावर विशेष पथकामार्फत थेट सर्जिकल स्ट्राईक करणार का? की गुन्हेगारीचा हा तथाकथित बादशहा आपल्या पैशांच्या आणि निवृत्त पोलिसांच्या जोरावर कायद्याला असाच रोज पायदळी तुडवत राहणार? यवतमाळच्या जनतेला आता केवळ आश्वासने नको आहेत, तर शिवा तिवारीच्या या जुगार साम्राज्याचा कायमचा नायनाट करणारी धडक कारवाई हवी आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!