साहुर -/ येथील प्रत्येक अंगणवाडीत शासना मार्फत धान्याचा पुरवठा लहान मुलांकरीता केला जातो त्यामध्ये अनेक प्रकारच्या आहाराचा समावेश आहे खिचडी करण्याकरीता पाकीट दिल्या जातात त्यामध्ये तिखट मीठ हळद सर्व मिक्स असतात परंतु निकृष्ट धान्य येत असल्याने पालकांच्या अनेक तक्रारी होत्या त्यामुळे तक्रारीची व वृत्तपत्रांची दखल घेत चौकशी आली आणि सर्व पालकांना बोलावण्यात आले तेव्हा ते पाकीट सर्वांच्या सामोर फोडण्यात आले आणि त्यात मेलेले सोंडे दिसल्याने सर्वांना धक्काच बसला आणि पालकांनी आपला रोष व्यक्त केला.
आष्टी तालुक्यातील साहूर गावातील अंगणवाडीत अतिशय निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत हे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते नेण्यास लाभार्थ्यांनी साफ नकार दिलेला आहे या धान्यामुळे आरोग्य धोक्यात येत असून हा पुरवठा अतिशय निंदनीय आहे लहान मुलांना आहार मिळावा याकरता शासनाच्या वतीने अनेक धान्याचे पॉकेट दिल्या जातात परंतु या पॉकेट मधील धान्य हे खराब असून लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे आहे त्यामुळे पालकांनी ते धान्य नेण्यास साफ नकार दिलेला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता लाभार्थी करीत आहे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भ्रष्टाचारी ठेकेदारांवर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे चौकशी करण्याकरिता आष्टी येथील विस्तार अधिकारी लोखंडे साहेब तसेच सुपरवायजर लोखंडे मॅडम उपस्थित होत्या तर पालक प्रफुल बोबडे, सतीश संतापे, सुरेश टरके, मनोहर कातोडे, शरद वरकड, भुसारी इत्यादी अनेक पालक उपस्थित होते आता काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे विशेष.