🔥पत्रकारांच्या प्रश्नांवर मंथन‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा एकदिवसीय कॅडर कॅम्प उत्साहात🔥पत्रकार महामंडळाचा मुद्दा विधानसभेत मांडणार – आमदार समीर कुणावर
वर्धा -/ पत्रकारिता क्षेत्रातील विविध प्रश्न, पत्रकारांचे हक्क आणि बदलत्या माध्यमविश्वातील आव्हानांवर संवाद व विचारमंथन घडवून आणण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम, विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कॅडर कॅम्प रविवारी वर्ध्यात उत्साहात संपन्न झाला.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजातील तळागाळातील लोकासाठी आपल्याला काम करायचे आहे पत्रकारांच्या न्याय हितासाठी स्थापीत पत्रकार महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून भरीव निधी उपलब्ध करून देणार आणि विधानसभेत देखील पत्रकार महामंडळाचा मुद्दा उपस्थित करणार! अशी ग्वाही विधानसभा तालीका अध्यक्ष तथा आमदार समीर कुणावर यांनी यावेळी बोलताना दिली. महात्मा गांधींच्या पावन भूमीत नालवाडी येथील अनुसया मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद काथे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी आमदार समीर कुणावार, माजी विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आमदार राजेश बकाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता विजय गाखरे , धोरणात्मक सल्लागार अदानी ग्रुप उच्च शिक्षण व तंत्र संशोधकचे कम्युनिटी डेव्हलपमेंटचे अधिकारी डॉ. अभिषेक जोशी, अदानी ग्रुपचे विशेष कार्य अधिकारी सुशांत वानखेडे, राज्य प्रवक्ता प्रमोद पाणबुडे, विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, विभागीय अध्यक्ष व्यंकटेश डुडमवार, दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशमुख, दैनिक लोकमतचे राजेश मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या राज्य कार्याध्यक्ष रेणुका रविंद्र कोटंबकर, महिला विंगच्या जिल्हाध्यक्ष मृणाल ढोक (रेंदके), सुप्रीमो जिल्हाध्यक्ष निलेश पिंजरकर, प्रा अजय मोहोड, जिल्हाध्यक्ष ( शहर), सुनिल साबळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), जिल्हा सरचिटणीस सचिन धानकूटे, राज्य कार्यवाहक एकनाथ चौधरी, गजानन बाजारे, ओंकार दडाळे, संजय नागापुरे, सुधीर खडसे, प्रमोद येडाके, प्रफुल्ल भट्कर, संजय टोणपे, गणेश शेंडे, पंकज तिवारी, सिंधी रेल्वे चे जिल्हा उपाध्यक्ष आनंद छाजड तर जिल्हा कार्याध्यक्ष गणेश इखार, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोडमारे, भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, अकोला जिल्हाध्यक्ष शंकर जोगी, वाशिम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, गडचिरोली ग्रामिण जिल्हाध्यक्ष संजय गजलवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष रामलाल सहारे, विदर्भातील अकराही जिल्ह्यातील प्रामुख्याने समावेश होता. हा संपूर्ण कॅडर कॅम्प सोशल मीडिया फेसबुक वर लाईव्ह प्रसारित करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे सुरेंद्र रामटेके, तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग तसेच फोटोग्राफी करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे राहुल तेलरांधे, तसेच या कॅडर कॅम्पला सभागृह उपलब्ध करून देणारे अनुसया सेलिब्रेशन सभागृहाचे संचालक वैशाली पुरुषोत्तम टोणपे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कॅडर कॅम्पच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रातील संघटनात्मक भूमिका, पत्रकारांसमोरील विविध प्रश्न, माध्यम क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि पत्रकारांच्या सामाजिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकारांनी संघटितपणे आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्यासोबतच पत्रकारितेची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रत्येक पत्रकार सदस्याने व्हाईस मिडीया चे सदस्यता नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करावी,तसेच प्रत्येकाचा विमा काढणे गरजेचे आहे असे आवाहन व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडीया यांनी केले. दहा वर्षे काम केलेल्यांना अधिस्वीकृती मिळावी, पेंशन योजनेतील जाचक अटी शिथिल करून पत्रकारांना पेंशन द्यावे यासाठी आपला लढा सुरू आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. तर राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारीता ही निष्ठेची आणि त्यागाची होती आता नफ्याची झाली आहे. कोण किती चांगलं लिहितं याची किंमत राहिलेली नसून ती भांडवलशाही लोकांच्या हाती गेली आहे. येणारा काळ पत्रकारीतेसाठी कठीण आहे. आता क्रांतीची वेळ आली आहे. येणारा काळ दिशा देणारा ठरेल.त्यासाठी हा लढा आहे असे मत व्यक्त केले.
महात्मा गांधींच्या विचारभूमीत झालेल्या या कॅडर कॅम्पमुळे विदर्भातील पत्रकारांमध्ये संवाद, समन्वय आणि संघटनात्मक बांधिलकी अधिक मजबूत करण्यास हातभार लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.याप्रसंगी प्रशंसनीय कामगिरी करणार्या पत्रकारांचा, पदाधिकाऱ्यांचा तथा मान्यवरांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम, विदर्भ विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कॅडर कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल ढोक यांनी केले.