रेतीघाटांचा लिलाव तातडीने करावा; अवैध रेती उपशावर कठोर कारवाई करावी

0

🔥रेतीघाटांचा लिलाव तातडीने करावा; अवैध रेती उपशावर कठोर कारवाई करावी

🔥शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

हिंगणघाट -/ यावर्षी हिंगणघाट तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नदीपात्रातील रेतीचा नैसर्गिक साठा तुलनेने कमी असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांनुसार अधिकृत रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अधिकृत रेतीघाटांचा लिलाव वेळेत न झाल्यास अवैध रेती उपशाला चालना मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच नदीपात्राचे पर्यावरणीय संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे.आमच्या माहितीनुसार अवेध रेती उपसा आताही मोठया प्रमाणावर होत आहे त्यांच्या पाठीशी सत्तेतील आमदार असल्यामुळे ते कोणालाही जुमत नाही त्यांचे म्हण आहे कि आम्ही या अवेध रेती चोरी चे पटवारी ते वर पर्यंत अधिकाऱ्यांना मदत करतो. हि कसल्या प्रकारची मदत आहे हे सुध्दा जनतेसमोर खुलासा झाला पाहिजे किंवा तुम्हा सर्व अधिकाऱ्यांना सत्तेच्या आधारावर बदनाम तर केल्याजात आहे का ?रेती माफिया आपल्या विभागाची बदनामी करत असल्यामुळे आपण प्रशासनाच्या माध्यमातून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

हिंगणघाट तालुक्यातील काही नदीघाट तसेच ग्रामीण भागातून अवैधरीत्या रेती उपसा व रेतीसाठा केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाले आहेत. भगवा, घाटसावली, ढिवरी, पिपरी तसेच इतर काही परिसरात रेतीसाठा मोठया प्रमाणावर असल्याची माहिती समोर आली असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. अनधिकृत रेतीसाठा आढळल्यास शासनाच्या नियमानुसार तो जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि महत्त्वाचे असे कि आपल्या विभागाकडून मोठे टिप्पर पकडल्या जात नाही असे ट्रॅक्टर ने रेतीचोरी करणारे छोटे माफिया चे म्हणे आहे म्हणून आमची मागणी आहे कि आपण कोणाच्याही दबावात न येता मोठे टिप्परने रेती चोरी करणाऱ्या माफिया वर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद ला पत्र देऊन नवीन कामाला दुष्काळ परिस्थितीमुळे मंजुरी देऊ नये यासाठी सूचना करावी तसेच जुन्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या बांधकाम साहित्याच्या उपलब्धते अभावी काही निविदा किंवा विकासकामे प्रलंबित राहत असल्यास, त्याबाबतही प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वी रेती चोरीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या अनुचित परिस्थितीची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये, यासाठी नदीघाटांवर नियमित गस्त, तपासणी व प्रभावी नियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. तसेच संबंधित महसूल, पोलीस व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून अवैध रेती उपशावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन रेतीघाटांचा लिलावबद्दल जिल्हाधिकारी साहेबांशी बोलून करून घेणे, अवैध रेती उपशावर नियंत्रण आणि शासनाचा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक साहेबांना माहिती साठी पाठविले आहे

यावेळी जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख श्री. सतीश धोबे, तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे, उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश अनासाने आणि शहरप्रमुख श्री. सचिन पोटदुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

यावेळी शंकर मोहम्मारे,सुनील आष्टीकर, सुरेश चौधरी, दिलीप चौधरी, नारायणराव घेयारे, गजानन काटवले,लक्ष्मन बकाने, अमोल वादाफळे, हिरामण आवारी,प्रमोद एडलेवार, सुखदेव कुबडे, दिलीप झोरे, सुभाष काटकर, प्रशांत कांबळे, अशोक भोसले, मारोती अराडे,दिलीप वैद्य, कमलेश कांबळे, अर्जुन हसबे, संजय तडस, विजय अष्टनकर,लक्ष्मण कापकर, अशोक बावणे, विजय कोरडे, ऋषी ठाकूर, युवराज ठाकूर, गणेश राऊत, गजानन देवढे, उमेश सुरसे, रोहन बनसोड, दुरवेश डफ, पांडुरंग निखाडे, मिलिंद खंगण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!