आर्वी-अमरावती मार्गावरील स्ट्रीट लाईटच्या अभावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

0

🔥आर्वी-अमरावती मार्गावरील स्ट्रीट लाईटच्या अभावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात.

आर्वी -/ आर्वी शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते पॉलिटेक्निक कॉलेज या मार्गावर सुमारे एक वर्षापूर्वी सिंगल फेज विद्युत लाईन टाकण्यात आलेली असतानाही आजपर्यंत त्या लाईनवर स्ट्रीट लाईट बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व वाहनचालकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर मार्ग हा आर्वी-अमरावती रोड असून अतिशय वर्दळीचा आहे. मात्र संपूर्ण रस्ता अंधारात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याची अवस्था देखील खराब असल्याने अंधारात वाहन चालवताना अनेकांना धोका पत्करावा लागत आहे.

या संदर्भात दिनांक 17/12/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडेही शिवसेना UBT च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसून संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी केली आहे. जर लवकरात लवकर यावर कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक          News-/24 आर्वी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!