जि प उच्च प्राथमिक शाळा,साटोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
वर्धा : स्थानिक जि प उच्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मला व फुले अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अरुणा हजारे मुख्याध्यापक रवींद्र पावडे, यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर माहिती दिली तसेच भारतातील प्रथम महिला शिक्षिका होण्याचा मानसावित्रीबाई फुले यांना मिळतो तसेच महात्मा ज्योतिबा फुले सोबत मिळून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला यावेळी उपस्थितांमध्ये स्थानिक बचत गटाच्या महिला शुभांगी बडे,रुपाली बडे,प्रणिता लिडबे,कांचन नराते,रुचिका घोंगडे,पूजा लिडबे,रजनी पोकळे,अर्चना ठाकरे,पूनम गावंडे ,मंजिरी डुकरे,नितेश आडे,जयवंता नेवारे,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून रवींद्र पावडे यांनी सावित्रीआई फुले यांचे जीवन चरित्र विषद केले,याप्रसंगी विद्यार्थी यांनी गीत सादर केले.शुभांगी बडे यांनी शिक्षणाचे महत्व यावर सुंदर नाटिका सादर केली.याप्रसंगी मंजिरी डुकरे,अरुणा हजारे,नितेश आडे यांनी मनोगत व्यक्त केले.सावित्री च्या भूमिकेत वेशभूषा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.बचत गटातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला,आभार नितेश आडे यांनी मानले.वैष्णवी ठाकरे व आदिती सहारे यांनी रंगतदार संचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.
सागर झोरे साहसिक न्यूज/24
