बोरधरणला पिकनिक ला जाणे पडले महागात ; ट्रॅव्हल दरीत कोसळली २८ जखमी
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
पिकनिकसाठी जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हलला अपघात झाला असून यात जवळपास २८ लोक जखमी झाले आहे. हि ट्रॅव्हलला जवळपास २० फूट दरीत कोसळली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, नागपुरातील जवळपास ३०-३५ लोक वर्धेतील बोर धरणावर पिकनिकसाठी जायला निघाले होते. सर्वकाही सुरळीत असताना अचानक ट्रॅव्हलच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी नागपूर- हिंगणी-सेलू मार्गावर असलेल्या पेंढरी घाटात ट्रॅव्हल्स कोसळली. यात ४-५ जण गंभीर जखमी झाले असून २८ वर लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील अनेक जण नागपुरातील कंठी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.