भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ९६ वा वर्धापन दिन संपन्न
प्रतिनिधी / वर्धा :
कष्टक-यासाठी लढणारा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ९६ वा वर्धापन दिन आयटक कामगार केंद्र वर्धा येथे काँ व्दारका इमडवार यांच्या अध्यक्षतेखाली काँ सुरेश गोसावी काँ.मारोतराव इमडवार काँ.मैना उईके काँ अनंता कदम माला भगत सोनाली पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्टाचा सिंहाचा वाटा असल्याचे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काँ मनोहर पचारे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूर येथे मौलाना हसरत मोहानी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली.आन्याय -अत्याचार शोषण व जमीदारी प्रथा विरुध्द आजादी ,समानता ,और वैज्ञानिक समाजवाद विचारसरणी स्विकारली. एकवेळी पक्षाचे लोकसभेत ४० खासदार तर महाराष्ट्रात २० आमदार होते . परंतु आजची परिस्थिती काय ? याबाबत चिंतन करण्याची गरज आहे . स्वतंत्र लढ्यात सर्वात जास्त बलिदान देणारा कम्युनिस्ट पक्ष आहे.
गावागावात शाखा मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद . पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक काँ अंनता कदम यांनी तर आभार मारोतराव इमडवार यांनी केले. यावेळी रजनी पाटील, चक्रधर आडे, वंदना नाईक यासह इतरही कार्यकर्त्यांची उपस्थित होते.