श्वानाची केली हत्या प्रकरणी आरोपीस अटक: घटना सीसीटीव्हीत कैद

0

साहसिक न्यूज24
देवळी / सागर झोरे:
दोन दिवसापूर्वी देवळी शहरात पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर रात्री अकराच्या दरम्यान एका माथेफिरु तरुणाने चाकूचे वार करून एका श्वानाची हत्या केली.
हा धक्कादायक प्रकार एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला या घटनेची फुटेज देवळी शहरात वायरल झाल्यामुळे देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांना उशिरा जाग आला त्यांनी दोन दिवसानंतर एका व्हिडीओ क्लिप द्वारे सांगितले की हा जो प्रकार घडलेला आहे त्याचा आम्ही भविदा 429 सह कलम 11 प्राण्यांना निर्दयतेचि वागणूक प्रतिबंधक अधिनियम 1960 अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटनेची सीसीटीवी फुटेज व्हायरल झाल्यामुळे देवळी शहराच्या नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली,जर रात्रीच्या वेळेस देवळी शहरात प्राणी सुरक्षित नाही तर आमचे काय?असा प्रश्न देवळीकर नागरिक विचारत होते
तेव्हा पोलिसांनां जाग आला देवळी पोलिसांनी आपले खबरी कामी लावले.आरोपी अक्षय बळीराम मडावी वय 24, वॉर्ड क्रं 13 राहणार देवळी या माथेफिरु तरुणाला अटक करण्यात केली.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात देवळी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!