जालना जिल्ह्यात अंबड शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश; ₹1.22 लाखांच्या बनावट नोटा जप्त…

0

🔥जालना जिल्ह्यात अंबड शहरात बनावट नोटांचा पर्दाफाश; ₹1.22 लाखांच्या बनावट नोटा जप्त.

जालना -/ अंबड पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ₹500 दराच्या 244 बनावट भारतीय चलनी नोटा जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत ₹1,22,000 आहे. बनावट नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
या प्रकरणी विकास अनिल गडगूळ (वय 26) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून व त्याच्या सहकाऱ्यांकडून बनावट नोटा मिळाल्या. यामध्ये सुनील खरात (वय 21), आकाश नारायण शेलके (वय 28) आणि आदित्य अमित गायकवाड (वय 19) यांचा सहभाग उघड झाला असून काही आरोपी फरार आहेत.
पोलीस तपासात आरोपी बनावट चलनाचा वापर व प्रसार करण्याच्या उद्देशाने नोटांची खरेदी-विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 179, 180 व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!