बाभुळगाव तालुक्यात चमेडीचोर लुच्छा सतिश मानलवार यांच्याकडून शेतकरी व अधिकाऱ्यांची पिळवणूक?

0

🔥हाच तो बाभुळगाव चा प्रशिद्ध चमडीचोर व खंडणीखोर सतीश मानलवार माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नावावर पाच लाखाची खंडणी केली वसूल

🔥बाभुळगाव तालुक्यात चमेडीचोर लुच्छा सतिश मानलवार यांच्याकडून शेतकरी व अधिकाऱ्यांची पिळवणूक?

 🔥माजी मंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करत खंडणी उकळली

🔥बोगस खते-बियाणे आणि अधिकाऱ्यांना धमकावून लाखो रुपयांची खंडणी; सतिश मानलवार यांच्या कथित कारभारावर बाभुळगावात संताप

​यवतमाळ -/ बाभुळगाव तालुक्यात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा गैरवापर करून शासकीय अधिकारी व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाभुळगाव तालुक्यात नव्हेतर संपुर्ण जिल्ह्यात चमडीचोर लुच्छा सतिश मानलवार यांच्यावर कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस कृषी निविष्ठा देणे, अव्वाच्या सव्वा व्याज आकारून आर्थिक लुटणे आणि शासकीय अधिकाऱ्यांना निलंबनाची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप होत आहेत. या प्रकारामुळे बाभुळगाव प्रशासकीय वर्तुळात तसेच शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. बाभुळगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या एका माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सतिश मानलवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘विधानसभेत प्रश्न (LAQ) उपस्थित करून निलंबित करेल’ अशी थेट धमकी दिली. या भीतीपोटी संबंधित अधिकाऱ्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा दावा करण्यात आला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे भासवून मानलवार यांनी अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक तणावाखाली ठेवल्याची चर्चा सध्या प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर तालुक्यातील गरीब शेतकरीही या त्रासातून सुटलेले नाहीत. बाभुळगाव येथील कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कथितरीत्या बोगस खते व बियाण्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर या मालावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकऱ्यांची उघड लूट केली गेल्याचे आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. आधीच दुष्काळ आणि नापिकीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर अशा प्रकारच्या गैरव्यवहाराने अधिकचा भार पडला आहे.

सतिश मानलवार यांच्या कारवाया केवळ कृषी केंद्र किंवा खंडणीपुरत्या मर्यादित नसून, परिसरातील रेती तस्करांशीही त्यांचे हितसंबंध असल्याचे उघडकीस येत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या घटकांना राजकीय पाठबळाची ढाल मिळवून देत स्वतःचे आर्थिक हित साधले जात असल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

एका जबाबदार राजकीय नेत्याच्या नावाचा वापर करून शासकीय यंत्रणा आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. संबंधित प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी बाभुळगाव तालुकावासीय करत आहेत.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!